सिंगापूरचे संरक्षणमंत्री एन. ई. हेन यांनी भारताच्या स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’ या विमानाचे मोठे कौतुक केले. हे विमान उत्कृष्ट आणि प्रभावशाली असल्याचे त्यांनी म्हटले. हेन यांनी मंगळवारी बेंगळूरु येथील कलाईकुंड या हवाई दलाच्या तळावरुन पहिले परदेशी नागरिक म्हणून तेजस विमानातून सुमारे अर्धा तास हवाई सफर केली. यावेळी त्यांनी भारताच्या या बहुद्देशीय हलक्या विमानाचे तोंडभरून कौतुक केले.हेन म्हणाले, “हे खूपच शानदार आणि प्रभावशाली विमान आहे. यावेळी त्यांनी एव्हीएम मार्शल ए. पी. सिंह आणि तेजस उडवणाऱ्या पायलटची प्रशंसा केली. विमानात बसल्यानंतर एका लढाऊ विमानात बसल्या नंतर आम्ही आरामात कारमधून प्रवास करीत असल्याचे भासल्याचे त्यांनी म्हटले.भारतीय संरक्षण विभागाने सांगितले की, बहरीन ‘एअर शो’ मध्ये देखील तेजस विमानाने शानदार कसरती दाखवल्या होत्या. यावेळी काही पश्चिम आशियाई देशांनी देखील ही विमाने खरेदी करण्यामध्ये रस दाखवला होता. सिंगापूरच्या संरक्षण मंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त बेंगळूरुमधून दोन तेजस विमानांनी उड्डाणे केली होती. यातून संरक्षण मंत्र्यांनी स्वत: प्रवास केला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews